आधारवड
आज मी आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या अश्या व्यक्ती बद्दल लिहतो आहे, ज्यांना आपल्या जन्मापासून तर शिक्षनाची व मुलीच्या लग्ना पासून तर मुलाच्या उज्वल भविष्याची काळजी असते. आता कळले असेल? हो बरोबर "बाप, वडील ".आपल्या आयुष्याचे शिल्पकार असता वडील.
'वडील म्हणजे समुद्रातले जहाज असत, खंबीर आधाराचे दुसरे नाव असत.' ज्याच्या मायेच्या छत्रछायेखाली लहान चे मोठे होतो. 'आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. किती काळजी वाहतो रे सर्वांची... लेकरांच्या चांगल्या भविष्यासाठी दिवस-रात्र झटतो. बाप म्हणजे नारळ असते, वरतुन दिसायला कठोर आणि आतून नरम. त्या कठोर पणामध्ये पण प्रेम असत. कठोर राहणे, रागावणे, ओरडणे हे आपल्या वरच्या प्रेमा खातीरच असत. आपल्या चांगल्या भविष्यासाठीच असत. आपल्या पेक्षा जास्त यशस्वी आपला मुलगा/मुलगी व्हावी अशी एकमेव निर्मल इच्छा फक्त बापच करू शकतो. आई चांगल्या संस्कारात आपल्याला घडवते पण वडील रागावून, ओरडून दुनियादारी शिकवता.
मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाची घाई लागते. मुलगी परक्याचे धन म्हणून बाप कन्यादान करतो. लग्नाची तारीख जशी जवळ येते. तशी सर्व व्यवस्था चोक करून बाप एकजागी बसतो. आठवतो त्या "इवल्याश्या चिमणीचे बोबडे-बोबडे बोल, पायात पैंजन घालून घरभर फिरणारा पैंजनाचा आवाज". लहानशी चिमणी मोठी झाली, आज मांडव सजला दारी, पाहूणे मंडळी गोळा झाली. आणि कन्यादान झालं. चिमणी भुरकंन उडून गेली. पण बापाच काळीज ते रडणार कस नाही.
एक बाप आपल्या मुलीला म्हणतो "बघता बघता मोठी झाली माझी चिमणी, आज मांडव सजला दारी, चिमणी लग्न तुझं म्हटलं म्हणजे पोटात येतो माझ्या गोळा, अग चिमणी तुच या घराचा खरा हिरा"जगातलं सर्वांत श्रेष्ठ दान बाप करतो. आपल्या काळजाचा तुकडा कन्यादान करतो.
वडील हे कडुलिंबाच्या वृक्ष सारखे असतात, त्याचे पान जरी कडू असले तरीही सावली नेहमी थंडच असते.
बाप नावाचं विश्व आपल्या आयुष्यात निसर्गा प्रमाणेच भासत मला, ते कसं.... या निसर्गाच्या सानिध्यात आपण वाढतो. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतो. तसच बाप असतो, लहानपणी बापाच्या अंगाखांद्यावर खेळणे असो किंवा आपल्याला चालायला शिकवतांना वडिलांचा हात घट्ट धरून चालणे असो, किंवा मोठे झाल्यावर परीक्षेच्या प्रत्येक निकाला बरोबर वडिलांचा खंबीर आधार असो. कारण दुनिया अपयशाने आपली मान खाली झुकायला भाग पाडत असेल, पण आपला बाप अपयशाने आपली मान कधीच खाली जाऊ देत नाहीत. कारण त्यांना माहिती असत, "आपण घडवलेले शिल्प ऐवढे पण कच्चे नाही लगेच फुटायला." म्हणून अपयश आल तरी डगमगून नजाता वडिलांकडे बघितल्या वर एक वेगळीच ऊर्जा भेटते. 'वडिलांचा हात ज्याच्या खांद्यावर अपयशा नंतर सुध्दा कायम असतो, तोच खरा यशस्वी'. कारण अपयशाच्या दहा पायऱ्या आपण चढलो, तरी यशाची अकरावी पायरी येतेच. ती येते वडिलांच्या आशीर्वादामुळे, आपल्या जिद्दीमुळे आणि वडिलांकडून शिकलेल्या चिकाटीमुळे.
"किसी को दौलत तो किसी को शौरत दिखाई देती है, मुझे पिता कि मोहबत्त दिखाई देती है. और पापा आपकी चेहरे कि झुरिया, झुरिया नही लगती इसकी हर लकीर में मुझे जन्नत दिखाई देती है."
माझ्या वडिलांकडून मीपण शिकलो. अपयशाला पाठ दाखवून यशाचे शिखर कस गाठायच. कारण माझे वडील माझ्या सोबत कायम असता, अपयश आले तरी, चुकलो तरी आहेतच. म्हणुन सांगतो मित्रांनो, आपल्या आयुष्यातला असा एकमेव व्यक्ती ज्यांच्या कडून आपण यशस्वी कस व्हायचं हे शिकतो.
डोळ्यात अश्रु न आणता जो प्रेम दाखवतो ना तो बाप असतो, जन्मभराची शिदोरी आपल्या पदरी टाकतो ना तो बाप असतो, आपल्या चुका माफ करून नवीन ऊर्जा आपल्यात निर्माण करणारा बाप असतो. जगायचं कस आणि संकटांना दूर लोटायच कस? हे सर्व आपण वडिलां कडूनच शिकतो." आणि या विनयशब्द एक स्वप्नपूर्ती लिखानामागे माझी प्रेरणा माझे वडील आहेत." त्यांच्या कडूनच शिकलो स्वप्नपूर्ती कशी पुर्णत्वास न्यायची."
आज माझ्या साठी विशेष दिवस आहे. आजच मी तुमच्या समोर हा लेख सादर केला आणि आज माझ्या वडिलांचा जन्मदिवस आहे. हे लेखन माझ्या वडिलांच्या चरणी अर्पण करतो.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा
धन्यवाद
फोटोस- Google


Khupch chhan ❣️
ReplyDeleteसुंदर... keep it up 👍🏼
ReplyDeleteThanks Docter
Deleteखुप छान अंबज्ञ बापुराया
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery very nice 👍👍 keep it up vinayak
ReplyDeleteखूप सध्या अन् सरळ शब्दात व्यक्त केली बापाची व्याख्या.....
ReplyDeleteमन भरून आले.......
Thanks sir
Deleteखूप छान असेच नवनवीन लेख आमच्या भेटीला येऊ दे.......
ReplyDeleteMast...👌👌Shriram
ReplyDeleteMast...👌👌Shriram
ReplyDeleteसर्वांनी नोंदवलेल्या अभिप्राया बद्दल मनापासुन आभार....🙏
ReplyDeleteNice one star keep it up and Regards to your friends 😀
ReplyDeleteधन्यवाद दादा.. 🙏
Deleteअभिनंदन!!!
ReplyDeleteखुपच छान रचना!👌👌
Keep it up.👍👍
धन्यवाद... 🙏
Delete