प्रजासत्ताक दिन
👑संपूर्ण जगातील एकमेव लिखीत स्वरुपात असलेली राज्यघटना आणि या राज्यघटनेवर चालत असलेला आपला देश. या महान लोकशाही प्रधान देशाचे खरे मालक आपण आहोत. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील तज्ञ व्यक्तीनी भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणीला बाजूला सारून लोकशाही अवलंबिली. आणि लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही भारतात अस्तित्वात आली.✨
भारत हे सार्वभौमत्व, समाजवादी धर्मनिरपेक्ष असलेले राष्ट्र आहे.
भारत प्रजासत्ताक राष्ट्र असावे असा महान विचार फक्त महान व्यक्तींच करु शकतात. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपले सर्वस्व त्यागून फक्त स्वतंत्र साठी लढत राहिले. अशा सर्व महान व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच घटना समिती मसुदा समिती मधील सर्व तज्ञ आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी.आर आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏
तसेच या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी शहिद झालेल्या या भारत मातेच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
❤️भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ❤️
Comments
Post a Comment