Posts

Showing posts from May, 2021

आधारवड

Image
     आज मी आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या अश्या व्यक्ती बद्दल लिहतो आहे, ज्यांना आपल्या जन्मापासून तर शिक्षनाची व मुलीच्या लग्ना पासून तर मुलाच्या उज्वल भविष्याची काळजी असते. आता कळले असेल? हो बरोबर "बाप, वडील ".आपल्या आयुष्याचे शिल्पकार असता वडील.      'वडील म्हणजे समुद्रातले जहाज असत, खंबीर आधाराचे दुसरे नाव असत.' ज्याच्या मायेच्या छत्रछायेखाली लहान चे मोठे होतो. 'आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. किती काळजी वाहतो रे  सर्वांची... लेकरांच्या चांगल्या भविष्यासाठी दिवस-रात्र झटतो. बाप म्हणजे नारळ असते, वरतुन दिसायला कठोर आणि आतून नरम. त्या कठोर पणामध्ये पण प्रेम असत. कठोर राहणे, रागावणे, ओरडणे हे आपल्या वरच्या प्रेमा खातीरच असत. आपल्या चांगल्या भविष्यासाठीच असत. आपल्या पेक्षा जास्त यशस्वी आपला मुलगा/मुलगी व्हावी अशी एकमेव निर्मल इच्छा फक्त बापच करू शकतो. आई चांगल्या संस्कारात आपल्याला घडवते पण वडील रागावून, ओरडून दुनियादारी शिकवता.       मुलीचे शिक्षण पूर्ण  झाल्यावर तिच्या लग्नाची घाई लागते. मुलगी परक्याचे धन म्हणून...