Posts

Showing posts from August, 2020

जयस्तुते

Image
 आरजू बस यही है मेरी हर सास देश के नाम हो, जो सिर उठे तो मेरे सामने तिरंगा हो, जो सिर झुके तो वतन को प्रणाम हो.      आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. सद्यस्थितीत देशात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आपण सर्व मिळून हा सोनेरी दिवस साजरा करू शकत नाही, पण मागील इतिहासाचे पाने उलगडून बघितल्यास या सोनेरी दिवसासाठी देशातल्या हजारो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी बलिदान दिले.       स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक धर्मनिरपेक्ष, सार्वभौम व ज्याचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमोघ विचारसरणीतून लिहले गेले असा जगातला सर्वात मोठा लोकशाही प्रदान देश उदयास आला.      भारत हा शूरवीरांचा देश. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, सम्राट अशोक यांच्यासारखे महायोध्दा भारताच्या पावन भूमीत जन्माला आले. तसेच भारत मातेच्या कुशीत असे अनेक शूर योद्धे जन्माला आले. जे आकाश जमीन व पाण्यात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात, अश्या शूर जवानांच्या चरणी हा लेख समर्पित करतो.        ना इ...