जयस्तुते

 आरजू बस यही है

मेरी हर सास देश के नाम हो,

जो सिर उठे तो मेरे सामने तिरंगा हो,

जो सिर झुके तो वतन को प्रणाम हो.


     आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. सद्यस्थितीत देशात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आपण सर्व मिळून हा सोनेरी दिवस साजरा करू शकत नाही, पण मागील इतिहासाचे पाने उलगडून बघितल्यास या सोनेरी दिवसासाठी देशातल्या हजारो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी बलिदान दिले. 

     स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक धर्मनिरपेक्ष, सार्वभौम व ज्याचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमोघ विचारसरणीतून लिहले गेले असा जगातला सर्वात मोठा लोकशाही प्रदान देश उदयास आला.

     भारत हा शूरवीरांचा देश. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, सम्राट अशोक यांच्यासारखे महायोध्दा भारताच्या पावन भूमीत जन्माला आले. तसेच भारत मातेच्या कुशीत असे अनेक शूर योद्धे जन्माला आले. जे आकाश जमीन व पाण्यात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात, अश्या शूर जवानांच्या चरणी हा लेख समर्पित करतो.

       ना इश्क के लिये जियेंगे,

      ना दौलत की लिये मरेंगे,

      जबतक धडकन चलेगी,

      तबतक अपने देश के किये लढेगे.

        


      भारताने स्वतंत्र प्राप्तीनंतर प्रत्येक क्षेत्रात आघाडीचे स्थान पटकावले. कृषी, अर्थ, क्रिडा, विज्ञान, संरक्षण. तसेच भारताचे महान शास्त्रज्ञ ज्यांनी नवनवीन शोध लावून व भारत भूमीच्या संरक्षनासाठी अद्वितीय अश्या संरक्षण शास्त्रांचा शोध लावला  असे महान शास्त्रज्ञ. तसेच जगाला दाखवून दिले की, भारत बलशाली होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.  जे जगातल्या कोणत्याच राष्ट्राला जमले नाही ते भारताने पहिल्याच प्रयत्नात करून दाखवले ते म्हणजे "मिशन मंगळयान" तसेच "मिशन शक्ती" करून भारत सुद्धा "अंतरिक्ष महाशक्ती" बनला. इथे मला मोहमद रफी सरांच्या गाण्यातील ओळी आठवतात...

      ये देश ये वीर जवानोंका

     अलबेलोका, मस्तनोंका,

     इस देश का यारो क्या कहना,

     यह देश दुनिया का गहना...

     भारत महासत्तेकडे वाटचाल करित असुन लवकरच भारत महासत्ता होईलच, असा माझा ठाम विश्वास आहे. माझा देश जगाचं नेतृत्व करायला सक्षम आहे. भारताला तरुणांचा देश म्हनुन ओळखल जाते. भारतीय व्यक्ती जगाच्या काण्याकोपऱ्यात कुठेही गेला तरी भारताची एकता, संस्कृती, सार्वभौमता कायम राखण्यासाठी तो कट्टीबद्द आहे.

     सद्याच्या कोरोना महामारीच्या काळात लढणारे डॉक्टर ,पोलीस व इतर सर्व कोरोना योद्धे यांच्या अथक परिश्रम व आत्मविश्वासामुळे आणि भारतीय आयुर्वेद शास्त्रामुळे भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, त्यामळे सध्या स्थितीत कोरोना महामारीतून बरे होणाऱ्यांचा रिकव्हरी रेट 70% टक्क्यांवर जाऊन पोहोचला. याला म्हणतात भारतीयांची शक्ती..

  

     चला तर मग अजून एक चांगली सवय लावूया ती म्हणजे आत्मनिर्भर होण्याची.

     आत्मनिर्भर भारत होवो,

     विश्वामध्ये शोभूनी राहो...


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🙏

फोटोस्-  Google 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आधारवड

प्रजासत्ताक दिन